सावंतवाडी : भाजप नेते संदिप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असून, गावडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपली.

या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे उपस्थित होते. सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी संदिप गावडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.













