भाजपाच्या लांजा तालुका दक्षिण मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्ष शैलेश खामकर यांच्या नेतृत्वाखाली जम्बो कार्यकारिणीची निवड

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका भाजपा दक्षिण मंडळाची नूतन जम्बो कार्यकारिणी अध्यक्ष शैलेश खामकर यांनी जाहीर केली आहे .
लांजा तालुका भाजपाच्या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष म्हणून शैलेश खामकर यांची यापूर्वीच निवड करण्यात आली होती .यानंतर अध्यक्ष शैलेश खामकर यांनी दक्षिण मंडळाची कार्यकारणी जाहीर केली आहे.
या नूतन कार्यकारणीच्या उपाध्यक्षपदी अनिल पन्हळेकर, दिपाली कदम, सौ अनन्या पालकर, प्रमोद कुरूप, गुरुप्रसाद तेली, अंजली कांबळे यांची निवड करण्यात आली असून सरचिटणीस म्हणून सुनील गुरव आणि शिवाजी पराडकर यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी समीरा सुर्वे, परेश नामे, सुयोग तोडकरी, मंगेश लांजेकर ,नामदेव राजापकर, शितल सावंत यांची निवड करण्यात आली असून कोषाध्यक्षपदी सुरेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे .
त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य पदी सौ.परिनिता सावंत, राजेंद्र बेर्डे, मनोहर पावसकर, वर्षा प्रभूदेसाई ,जयवंत जाधव, रामदास नामे, संजय बेंद्रे, संकेत घाग ,भास्कर खामकर, तुकाराम मांडवकर, मंगेश कदम, सौ शोभा किरकिरे, सौ अनुजा कोलंबेकर, सौ देवयानी पांचाळ ,सौ.साक्षी पराडकर, पंढरीनाथ घनावडे, सौ ममता पावसकर ,सौ रश्मी सुर्वे, सौ सरिता पावसकर, महेश गोरुले, यशवंत कवचे, तुकाराम प्रिंदावणकर, सौ साक्षी जाधव ,विकास आयरे, महेंद्र बागवे, सौ.दीक्षा खामकर ,सौ आश्विनी पन्हळेकर, सौ. वृषाली शिगम, दिनेश बिजम, राजेंद्र घनावडे, सौ. संपदा कुरूप , सौ.साक्षी भुवड, अकबर मालीम, चंद्रकांत भुवड, सौ मानसी डाफळे, अनिल कांबळे, मधुकर पालये, कमलाकर शिवगण, मनोज चांदोरकर, अभिजीत वाघदरे, सौ संजना बराम, शेखर सावंत, सुयोग तोडकरी, भक्ती शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे .
या नूतन कार्यकारणीच्या माध्यमातून तालुक्यात भाजपा पक्षा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असून भविष्यात पक्षाला अधिक बळकटी आणणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष शैलेश खामकर यांनी दिली.