चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या वाढदिनी चंदगड ते पणजी बस सुरु होणार

तालुक्यातून समाधान व्यक्त

दोडामार्ग: सुहास देसाई
चंदगड आगाराची चंदगड-दोडामार्ग-पणजी ही एसटी बस फेरी मंगळवारपासून सुरू होणार आहे. याबाबतचे अधिकृत पत्र चंदगड आगार व्यवस्थापकांनी शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो यांना दिले आहे. या बस फेरीमुळे अनेक प्रवाशांची होणारी गैरसोय मात्र आता दूर होणार आहे.यासाठीच आमदार शिवाजी पाटील यांनी विशेष लक्ष घातल्याने त्याच्या वाढदिनी बस सेवा सुरु होत आहे याचा लाभ दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील प्रवासीसह विजघर हेवाळे सोनावल तेरवण मेढे गावातील विदयाथी याना होणार आहे

बेळगाव व कोल्हापूर ते गोवा जोडणाऱ्या तिलारी घाटातून एसटी सह अवजड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश गतवर्षी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पारित केला होता त्यानंतर तब्बल आठ महिने एसटी सेवा बंद राहिली. परिणामीया मार्गांवरील सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. अखेर घाटातून एसटी बस सुरू झाल्या. मात्र अनेक बस फेऱ्या बंद पडल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी बंद पडलेली एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडे मागणी केली. मात्र चंदगड-दोडामार्ग-बेळगाव ही बस सेवा बंदच राहिली. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी, प्रवाशांचे हाल होऊ लागले. ही बस सेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता याबाबत दोडामार्ग शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो व हेवाळे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य समीर देसाई यांनी ३० जुलै रोजी उपोषण छेडण्याचा इशारा चंदगड आगार व्यवस्थापकांना दिला होता. मात्र अपुऱ्या गाड्या व मनुष्यबळाचे सबब पुढे करत कोल्हापूर आगाराच्या एसटी बस सुरू असल्याचे चंदगड आगार व्यवस्थापकांनी मायकल लोबो व समीर देसाई यांना पत्राद्वारे कळविले आहे

चंदगड आगाराच्या कार्यकक्षेत मर्यादित संसाधनांमुळे सध्या नवीन बस सेवा सुरू करणे किंवा थांबवलेली सेवा पूर्ववत करणे तात्काळ शक्य होत नसल्याचे १९ जुलै रोजी कळविले. मात्र प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता या मार्गे बस सेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याने मायकल लोबो व समीर देसाई यांनी ही सर्व कैफियत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी तात्काळ बस फेरी सुरू करण्याच्या सूचना चंदगड आगार व्यवस्थापकांना सूचना दिल्या होत्या त्यामुळे मंगळवारपासून चंदगड-दोडामार्ग-पणजी ही बस फेरी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र आगार व्यवस्थापकांनी मायकल लोबो यांना दिले आहे.यासाठी विशेष सहकार्य चंदगड तालुका भाजपा अध्यक्ष विशाल बल्लाळ यांचे लाभले आहे

दरम्यान
उद्या दि. 30 जुलै रोजी आमदार शिवाजी पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्याच दिवशी पणजी गोवा बस सेवा सुरु होत असल्याने वाढदिवसाची भेट दिली आहे अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे

चंदगडहून सकाळी ९ वा. एसटी बस सुटणार असून ती पणजी येथे दुपारी १२:४५ वा. पोहोचणार. तर सायंकाळी पणजीहून ४ वा. निघणार असून चंदगड येथे ७:१५ वाजता पोहोचणार आहे.