आगामी सर्व स्थानिक स्वराज संस्थेवर भाजपचाच झेंडा : कार्यकारणीचा निर्धार
वेंगुर्ले l प्रतिनिधी :भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार वेंगुर्ला तालुक्यातील मंडल कार्यकारणी तब्बल ६१ जणांची जाहिर करण्यात आली. या कार्यकारणीत नविन तसेच युवा चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती व नगरपालिका या निवडणुकीत शत- प्रतिशत भाजप हा नारा असून या सर्व स्थानिक स्वराज संस्थेवर भाजपचा झेंडा असेल असा निर्धार यावेळी नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच दर महिन्याच्या १२ तारीखला महिन्याची मासिक मिटिंग घेण्याचे ठरविण्यात आले.
वेंगुर्ले येथील भाजपा कार्यालय भाजप राज्य कार्यकारणी सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा संपन्न झाली. यावेळी तालुकाध्यक्ष श्री.विष्णु उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते नवीन मंडळ कार्यकारणी जाहीर करण्यात आली तसेच नव नियुक्त मंडळ पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुख यांना गुलाब पुष्प व नियुक्ती पत्रक देण्यात आली. नूतन कार्यकारणी मध्ये तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू चंद्रकांत परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड. सुषमा प्रभुखानोलकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, माजी मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रीत सदस्य साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष श्री.राजन गिरप, जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश सामंत, सर्व कार्यकारणी सदस्य, दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस, तसेच जिल्हा, मंडळ पदाधिकारी महिला मोर्चा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, विविध आघाडि मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












