रत्नागिरी :
महसूल दिनानिमित्त रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाच्यावतीने रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे आदी अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध असलेला हा विभाग असून, तळागाळातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल अशी कामे कर्मचार्यांनी कामे करावीत असे मत याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी व्यक्त करताना सर्वच कर्मचार्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप मारली.
यावेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार श्रृती सावंत, माधवी कांबळे, रिध्दी गोरे, सुदेश गोताड, मिलींद सावंतदेसाई, सहा. महसूल अधिकारी राजन गमरे, मनुश्री जोशी, रसिका खेडेकर, महेश आठल्ये, शुभांगी पाटील, मंडळ अधिकारी सुनील किर, प्रतापसिंह पोले, अमर चाळके, उध्दव माने, महसूल सहाय्यक संजीवनी गोरे, रविकांत खाके, पल्लवी शेवाळे, विकास चव्हाण, प्रिती पाटील, पवन राठोड, ग्राममहसूल अधिकारी विश्वंभर मुरकुटे, सौरभ जाधव, सचिन पाटील, मयुरा परांजपे, राजश्री ऐवळे, नेहा तेंडुलकर, जयश्री पाटील, द्वारकेश तायडे, सुरेश चारभे, भुकरमापक राकेश शिंदे, वाहनचालक संदीप साळवी, शिपाई संतोष चव्हाण, रविंद्र वायंगणकर, संतोष पवार, कोतवाल विक्रांत कदम, प्रियंका वीर, शेखर सावंत, प्रणित साळवी, दिनेश कांबळे, अजय मोहिते, पोलीस पाटील जयंत फडके, विश्वनाथ पाटील, प्रिया बंदरकर, राकेश सुर्वे, देविदास सावंत, संतोष चव्हाण आदी कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.











