ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य माननीय श्री.भरत मोरे सर यांनी महात्मा गांधीजी चंद्रशेखर आझाद व भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रतिमा पूजनानंतर क्रांतीकारांचा जीवनपट ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. सिद्धेश साळुंखे इयत्ता ११ वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक प्रतिनिधी सौ. अनन्या दळवी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. क्रांती दिनाच्या औचित्य साधून प्रशालेने इयत्ता १ ली ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी वर्गवार देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आसावरी चव्हाण यांनी केले. तर सहाय्यक शिक्षक श्री.अभिजीत मनवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य मा.श्री. भरत मोरे तसेच इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सर्व विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.