चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रत्येकवेळी नवनविन शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगिण विकासाला चालना कशी मिळेल या साठी प्रयत्नशील असते. या मधून कलाविद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी मिळाव्यात हा या मागचा प्रार्थमिक उद्देश असतो. यासाठी चित्रकार शिल्पकारांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, शैक्षणिक सहल, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो.यावर्षी सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे व सावर्डे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पोस्टर डिसाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी दिन हा विषयी देण्यात आला होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ठ पोस्टर तयार करून आणली होती. यातून तीन क्रमांक काढण्यात आले. कु.सायली दिनेश कदम -प्रथम, कु.ईशा संदीप राजेशिर्के-द्वितीय क्रमांक, कु. तुळशी सुरेश भुवड -तृतीय क्रमांक मिळवून यांनी यश संपादन केले आहे. या पारितोषिक वितरण प्रसंगी सावर्डे पोलीस ठाण्याचे गायकवाड- सहाय्यक पोलीस निरीक्षक, विनोद आंबेरकर- पोलीस अंमलदार, मोहिते मॅडम, गमरे मॅडम तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, प्राचार्य. माणिक यादव, प्राद्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजा निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
फोटो फाईल- सीपीएन२७-९












