मसुरे | झुंजार पेडणेकर : हिंदळे गावची कन्या आर्या अजित राणे हिने शालांत परीक्षा दहावी मधून शंभर टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल हिंदळे ग्रामपंचायत व हिंदळे ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मानपत्र देत तिचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण सुद्धा तिच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मकरंद शिंदे म्हणाले, आर्यामुळे गावाचे नाव जिल्ह्यात रोशन झाले आहे. विध्यार्थ्यानी तिचा आदर्श घेत अभ्यास करावा असे आवाहन विध्यार्थ्यांना केले.
यावेळी माजी सभापती सुनील पारकर, उपसरपंच रुपेश राणे,ग्रामपंचायत अधिकारी श्री कुबल,
पोलीस पाटील संदीप हिंदळेकर, सदस्य सौ राणे,सत्यवान राणे, अविनाश राणे, मधुकर राणे, मोहन राणे,हिंदळे गावातील सर्व प्राथ. शाळातील मुले, मुख्या.,शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरानी आर्या हिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या वेळी राणे कुटुंबातील आर्याचे वडील श्री अजित राणे व आजोबा श्री मधुकर राणे व मोहन राणे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. सत्कारा बद्दल आर्या हिने आभार मानले.










