दापोली l प्रतिनिधी : गेल्या 24 तासांमध्ये दापोली तालुक्यात धुवांधार पाऊस पडत असून तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दापोलीचे गटशिक्षणाधिकारी यांनी दापोली तालुक्यातील शाळा, महाविद्यालय यांच्याकरता शालेय शिक्षण समिती व स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळांना सुट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. दापोली तालुक्यातील समुद्र किनारी असलेल्या आंजर्ले तरीबंदर उभाआगर भंडारवाडा संपर्क तुटला आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील लक्ष्मीनारायण मंदिर ते कर्दे याजवळ रस्त्यावरील जवळजवळ वीस ते पंचवीस घरांची संपर्क तुटला आहे. बुरोंडी गावात पूर जनजीवन विस्कळीत
घरांमध्ये पाणी शिरले आहे. दापोली शहरातील नजीक असलेल्या जालगांव या ठिकाणी खलाटी ,नागरबुडी मध्ये घरात पाणी शिरले.बचाव कार्य सुरू केले आहे. नागरबुडी, फणस साचे वाकन, भाटकर हॉस्पिटल रोड वर वर 2 फूट पाणी आले आहे. फणसू–भडवले मार्ग पाण्याखाली असुन वाहतूक ठप्प आहे. दापोली तालुक्यातील किनारपट्टी भागातील पाच पंढरी येथे घरांचे पत्रे उडून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जालगांव मधील एक एका घराची भिंत कोसळून पाणी घरामध्ये शिरले होते. दापोली तालुक्यातील आवाशी नजीक दादर पूल आजही पाण्याखाली आहे.
नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आपत्कालीन परिस्थितीत जवळचे पोलीस पाटील, तलाठी,सर्कल यांना संपर्क साधावा असा आवाहन दापोली तहसीलदारांनी केले आहे.












