हरकीत व सूचनांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत : दहा प्रभाग आणि 20 नगरसेवक संख्या
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद निवडणुक 2025 साठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०११ ची जनगनना विचारात घेऊन शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग निश्चीत करण्यात आली असून 20 नगरसेवक संख्या असणार आहे.
17 नगरसेवक असलेल्या नगरपरिषद मध्ये वीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी २१ जण असणार आहेत. प्रभाग रचना निश्चीत झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
प्रभाग रचना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदरच्या हरकती व सूचना नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. पालिकेची प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जाहीर केली आहे. यापुढे सर्वांचे लक्ष प्रभागांतील आरक्षणाकडे लागून राहणार आहे.
नगराध्यक्ष जनतेतूनच निवडले जाणार असे सध्या तरी स्पष्ट आहे. मात्र आरक्षणाची प्रतिक्षा सर्वाना आहे.












