सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी श्री रमण किनळेकर यांची केंद्रशाळा सुरंगपाणी शाळेला सदिच्छा भेट 

शिक्षणसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही समाजाशी आपले नाते जपणारे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी गुरुवर्य श्री. रमण किनळेकर यांनी जिल्हा परिषदे केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या भेटीमुळे शाळेच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला.

या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून गणिताच्या अभ्यासवाटा सोप्या करण्याचे काही मौलिक उपाय सांगितले. विशेष म्हणजे, आपल्या दीर्घ सेवेत त्यांनी प्रकाशित केलेले स्वलिखित *गणित मुलभूत कौशल्ये* हे पुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात प्रदान के ली. हे पुस्तक विद्यार्थ्यांना गणिताचे बारकावे समजून घेण्यासाठी केवळ अभ्यास साहित्य नसून ज्ञानाचा खजीना ठरणार आहे.

 

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम शामल मांजरेकर – पिळणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व या मौल्यवान भेटीसाठी कृतज्ञता व्यक्त केली.