खेड(प्रतिनिधी )ज्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी हात मिळवणी करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देण्याचे पाप केले, त्या उद्धव ठाकरेंचा राजकीय कारभार आता संपला आहे, असा टोला लगावत ते संधीसाधू माणूस असल्याची बोचरी टीकाही शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली.
महाराष्ट्राच्या मनात आहे तसंच होईल. या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करत काँग्रेससोबत गेलात. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात होते का, असा खोचक प्रश्नही उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीत तमाम जनतेने महायुतीवर शिक्कामोर्तब केले. ठाकरे ‘ब्रँड’ शिंदे शिवसेनेकडेच आहे. यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार आहे, असे ठणकावते मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपनेते संजय कदम यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.











