करुळ घाटात कोसळली दरड : काही काळ वाहतूक ठप्प 

वैभववाडी l प्रतिनिधी :      मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला. आज सकाळी करूळ घाटात दरड कोसळल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित यंत्रणेने दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली आहे.

तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका करूळ घाटालाही बसला. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मार्ग बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहन चालकाने दरड बाजूला करून मार्ग काढला होता. परंतु जेसीबीच्या साह्याने संबंधित यंत्रणेने रस्त्यात पडलेले दरड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाले.