भारतीय जनता पार्टीसाठी समर्पण भावनेने काम करा! नंदू परब

 

▪️भाजपच्या मसूरे जि. प. विभागीय कार्यालयाचे उदघाट्न

मसुरे | झुंजार पेडणेकर : प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि त्या नंतर स्वतःचा विचार असा संदेश भारतीय जनता पार्टी देते. शासनाच्या अनेक योजना लोकांच्या कल्याणसाठी चालू आहेत. योजनांचा थेट लाभ जनतेला होत आहे. भारतीय जनता पार्टीचे हे मसुरे विभागीय कार्यालय समाजसेवेसाठी उपयोगी पडेल. पक्षासाठी समर्पण भावनेने काम करा. संघ तुमच्या कामाचा लेखाजोखा घेत असतो. मी सुद्धा सामान्य कार्यकर्ता होतो परंतु आज मी कल्याण डोंबिवली जिल्ह्याचा भाजपचा अध्यक्ष आहे. पक्ष हित आणि शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवा, तुम्हाला आणखी काही करण्याची गरज पडणार नाही असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व मसुरे गावचे सुपुत्र नंदू परब यांनी येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या मसूरे जि. प. विभाग कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मर्डे बाजारपेठ येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. रेल्वेमध्ये चहा विकणारे या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तसेच डोंबिवलीमध्ये रिक्षा चालवणारे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होऊ शकतात. आणि असे फक्त भाजप या पक्षा मध्येच होऊ शकते असे ते म्हणाले. यावेळी श्रीफळ फोडून डॉ. सुधीर मेहेंदळे यांनी उदघाट्न केले. विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यालयातून केले जाईल. विकासाचे एक दालन खुले झाले आहे. प्रत्येक जिल्हा परिषद विभागात भारतीय जनता पार्टीचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे असे यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले. यावेळी मालोंड युवा सेना शिवसेना ठाकरे गट उप तालुकाप्रमुख नवनाथ घाडी, ग्रामपंचायत सदस्य संतोष आचरेकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. मसुरे गावचे सुपुत्र नंदू परब यांची कल्याण डोंबिवली भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी चिंदर माजी उपसरपंच दीपक सुर्वे, संतोष गावकर, जिल्हा सचिव विजय केनवडेकर, ललित चव्हाण, तालुका सचिव महेश मांजरेकर, रमण वाईरकर, तालुका उद्योग व्यापार आघाडी रोहेश गांवकर, शिल्पा खोत, डॉ सुधीर मेहंदळे, विजय निकम, सुमित सावंत, तातू भोगले,तालुका चिटणीस बंडू गावडे, शक्ती केंद्र प्रमुख यासीन सय्यद,जगदीश चव्हाण, पराग खोत, प्रसाद मुळीक, अमरेष सावंत, बबलू प्रभुगावकर, जगन्नाथ ठाकूर, प्रमोद खाडिलकर, अनिल वंजारे, संतोष बागवे, नंदू नाईक,आचरेकर मॅडम, प्रताप खोत,जितेंद्र खोत, प्रणय खोत, संदीप खोत,रणजीत खोत,चिंतामण खोत,पंढरीनाथ नाचणकर, सन्मेश मसुरकर, सोहम सावंत,उषा परब, नाथा बागवे, अमोल परब,निलेश खोत, रामदास बागवे, सार्थक परब,सुनील परब, समीर परब, नागराज नवीलकर,स्वानंद परब, सूरज परब, गौरव बागवे आदी उपस्थित होते. आभार महेश मांजरेकर यांनी मानले.