शंकर वैद्य साखरपा
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयोजित ६ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा २०२५ दिनांक २९ ते ३१ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर ( गारखेडा) येथे आयोजित करण्यात आली.
या स्पर्धेत 28 जिल्ह्यांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये मुंबईचे नेतृत्व करुन सौ. स्मिता शांताराम अंकुशराव यांनी गोल्ड मेडल पटकावून संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
त्यांच्या यशामुळे रत्नागिरी, किरबेट गाव वासियांची तसेच शहर वासियांची (मुंबई) मान अभिमानाने उंचावली आहे.
तसेच सौ. अंकुशराव यांची २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर आंध्रप्रदेश विजयवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सौ अंकुशराव यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.












