गरबा वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटात सौ. सोनाली डिंगणकर प्रथम तर लहान गटात मयंक कुळे प्रथम नवनिर्माण युवा मंडळ डिंगणकरवाडीचा उपक्रम
चिपळूण (वार्ताहर) : नवनिर्माण युवा मंडळ डिंगणकरवाडी बामणोली यांच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सिताराम तांबिटकर व परिवार यांनी पटकावला तर गरबा नृत्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक सौ. सोनाली शैलेश डिंगणकर तर लहान गटात प्रथम क्रमांक मयंक कुळे यांनी पटकावला.
दरवर्षीच या मंडळाच्या वतीने घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते त्यानंतर गणपती विसर्जन दिनी रात्री कुड जागवणे आणि गरबा नृत्याचा कार्यक्रम गेली अनेक वर्ष होत आहे. यावर्षी खास गरबा नृत्य आणि विविध वेशभूषा स्पर्धेचा आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. याला उत्तम प्रतिसाद लाभला. नवनिर्माण युवा मंडळाने आयोजित केलेल्या घरगुती गणपती स्पर्धेमध्ये महिला सक्षमीकरण हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून व त्याचे महत्त्व पटवण्यासाठी सिताराम भागोजी तांबिटकर आणि परिवार यांनी सुंदर देखावा साकारला त्यामुळे या स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक देण्यात आला. द्वितीय क्रमांक राजाराम बाबू घाणेकर यांनी पटकावत शिवकालीन राजवाडा साकारला होता. तृतीय क्रमांक सौ. दिपाली व सौ सोनाली डिंगणकर परिवार यांनी केदारनाथ मंदिर प्रतिकृती उभारली होती. या सर्वांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर गरबा नृत्य आणि वेशभूषा स्पर्धेमध्ये मोठ्या गटांमध्ये मराठमोळी संस्कृतीचे प्रदर्शन घडवत सौ. सोनाली शैलेश डिंगणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सिद्धेश राजेश पावसकर तर तृतीय क्रमांक उत्कृष्ट स्त्री वेशभूषा साकारत प्रणित दीपक कुळे यांनी पटकावला. तर या स्पर्धेत लहान गटांमध्ये शेतकरी वेशभूषा परिधान करून मयंक मनीष कुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धांत शैलेश डिंगणकर याने द्वितीय क्रमांक पटकावला तर राधेची वेशभूषा साकारत कुमारी मायरा मनीष कुळे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी वाडीतील काही व्यक्तींनी पारितोषिक देऊन सहकार्य केले. त्यामध्ये स्वप्नील बोबले, विजय बाबुराव डिंगणकर, नरेंद्र नामदेव घाणेकर, संतोष सुरेश तांबिटकर, श्रीकांत सिताराम तांबिटकर यांनी पारितोषिक प्रायोजित केली होती. या सर्वांच्या माध्यमातून घरगुती गणेश सजावट स्पर्धा आणि गरबा नृत्य वेशभूषा स्पर्धा पार पडल्या. यासाठी नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी, महिला मंडळ व ओम पोवारडेबाजी उत्कर्ष मंडळ मुंबई डिंगणकरवाडी या सर्वांचे स्पर्धेला सहकार्य लाभले. नवनिर्माण युवा मंडळ यांनी अतिशय सुंदर प्रकारे नियोजन करत हा कार्यक्रम यशस्वी केला. नवनिर्माण मंडळाचे कार्याध्यक्ष शैलेश डिंगणकर, अध्यक्ष रवींद्र डिंगणकर, सचिव राकेश पावसकर, खजिनदार नरेश घाणेकर, कार्यवाह राहुल डिंगणकर व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी मेहनत घेत हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला. या कार्यक्रमाला स्थानिक मंडळ आणि मुंबई मंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते.