चिपळूण (प्रतिनिधी) : पहेलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या प्रति आदर अभिमान व्यक्त करण्यासाठी आणि तसेच देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चिपळूण येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीण पूर्व मंडलाच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खेर्डी ग्रामपंचायत येथून माजी सैनिक, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवा तरुण आणि देशभक्त नागरिक यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली.
‘भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, वीर जवान अमर रहे’ अशा देशभक्तीच्या गगनभेदी घोषणा आणि स्पीकरवरील देशाच्या गाण्यांनी खेर्डी येथील वातावरण भारावून टाकले होते. ही पदयात्रा खेर्डी बाजारपेठ मार्गे बहादुरशेख नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक जवळ आली. या ठिकाणी माजी सैनिक सुभेदार संतोष भुरण यांनी देशाच्या घोषणा दिल्या आणि सर्वांच्या उपस्थितीत सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती रामदास राणे यांनी आपल्या मनोगतामध्ये या रॅलीचे महत्व पटवून दिले आणि देशाभिमान जागृत करणाऱ्या या पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले आणि पदयात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी आणि गुरुकुल महाविद्यालयाच्या विध्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला.
यावेळी या तिरंगा पदयात्रेला भाजपा चिपळूण ग्रामीण मंडलाचे अध्यक्ष विनोद भुरण, पंचायत समिती माजी सभापती रामदास राणे, पंचायत समिती माजी सभापती स्नेहा मेस्त्री, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक आशिष खातू, खेर्डी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेंद्र शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ दाते, शक्तिकेंद्र प्रमुख विनय दाते, तिरंगा यात्रा जिल्हा सहसंयोजिका शितल रानडे, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा अनिता राजेशिर्के, माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, जगदीश वाघूळदे, आरती धामणस्कर, सिद्धी सुतार, दीपक शिंदे, विजय आयरे, महेश शिंदे, सुदेश चिले, दिनेश आपिष्टे, शैलेश लब्दे, योगेश नलावडे, मधुकर फके, सतीश पंडित, मिलिंद शिंदे, संतोष दाते, नाना शेंबेकर, सुदेश चिले, सुरेश भुरण, रमेश चव्हाण, समीर पवार, श्रीधर भुरण, संकेत चिले, मंगेश चिले, राकेश भुरण, मंदार ठसाळे, स्वप्नील भुरण, संजय शिगवण, प्रसाद वरेकर, कुणाल आंबेकर, सागर कदम, निलेश पोसनाक, निलेश नार्वेकर, किशोर कदम, आदित्य गजमल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.











