राजापुर BREAKING : हातिवले टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो गाडीची जोरदार धडक

एकजण जागीच ठार, पाच जण जखमी

राजापूर | प्रतिनिधी : राजापुरात गोवा महामार्गांवर हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेश शेखर नायडू (३४) रा. मालाड पश्चिम मुंबई हे जागीच ठार झाले आहेत. तर या कार मधील अन्य पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी १२ त. १२.१५ वाजण्यारच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

एकूण सहा प्रवाशी या गाडीतुन प्रवास करत होते. यातील राजेश शेखर नायडू (३४) हे जागीच ठार झाले असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तृशांत सुरेश शेलार (३२ ), कुणाल शिवाजी साळुंखे (३९), हर्षदा कुणाल साळुंखे (२८ ), प्रीती राजेश नायडू (२८ ), श्राकांत नामदेव घाडगे (२८) सर्व रा. मालाड पश्चिम मुंबई यांचा समावेश आहे. या जखमींवर उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे.

अपघातग्रस्त महेंद्रा मराझो गाडी क्रमांक एम एच 02,इ झेड 4748 मुंबई, मालाड कडून कणकवली, भिरकोन्ड कडे चालली होती. एकूण सहाजण या महिंद्रा गाडीतून प्रवास करीत होते. कणकवली येथे नातेवाईकांकडे ते चालले होते. वाटेत त्यांनी चहा, नाष्टा केल्यावर ते पुढे चालले असता राजापूर, हातीवले येथील टोल नाक्यावर सदर गाडी आली असता तेथुन पुढे उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 10,ए डब्लू 8144 याला महेंद्रा मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये महेंद्रा मराझो गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णलायात दाखल करण्यात आले होते पण तत्पुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. सर्व जखमीना राजापूर मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवलीला हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना सहाकार्य करत वाहतुक सुरळीत केली व पंचनामा केला.

तर अपघाताची माहीती कळताच मुन्ना खामकर, राजू कुरूप, करेंद्र कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर संदीप राऊत आदींनीही अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. तर स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.