जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कृष्णाई रावराणे, वृंदा मोरे व कॅरम मध्ये अथर्व पांचाळ यांचे सुयश

*जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कृष्णाई रावराणे, वृंदा मोरे व कॅरम मध्ये अथर्व पांचाळ यांचे सुयश*

 

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उपरकर शूटिंग रेंज वेंगुर्ला येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यांना क्रीडाशिक्षक अजिंक्य पोफळे यांनी मार्गदर्शन केले..

*ओपन साईट प्रकारामध्ये*

*14 वर्ष वयोगट मुली*

1) कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे ( प्रथम क्रमांक)

*17 वर्ष वयोगट मुली*

1) वृंदा भरत मोरे ( द्वितीय क्रमांक )

 

 

 

 तसेच कणकवली तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटचा अथर्व नितीन पांचाळ या विद्यार्थ्यांने पाचवा क्रमांक मिळविला.त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशस्वी विद्यार्थ्याचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी व खजिनदार,शाळा समिती चेअरमन,संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत…