गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. मनोजकुमार विश्वनाथ नार्वेकर व प्रा गौस दादासो मुल्ला यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशाळेतील माजी मुख्याध्यापक किशोर पाटकर यांनी दरवर्षी शिक्षक दिनी एका ज्येष्ठ शिक्षकाचा सन्मान करावा असा ट्रस्ट ठेवला आहे.या निमित्त शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नियत वयोमनानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या या दोन ज्येष्ठ व्यक्तींना यथोचित सन्मानित करण्यात आले.प्रा मनोजकुमार नार्वेकर व प्रा गौस मुल्ला यांनी या प्रशालेत सुमारे ३० वर्षे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात अध्यापना चे काम केले आहे.प्रा मनोजकुमार नार्वेकर ह्यांनी मध्यंतरीच्या काळात विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
दरम्यान या सत्कार समारंभा प्रसंगी संस्थेचे सचिव दीपक पोंक्षे,संचालक सुभाष सहस्त्रबुद्धे, संजय सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी सत्कार मूर्तींनी व सहकाऱ्यांनी आणी संस्था संचालकांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमावेळी शाळेच्या संस्थापक दिनी एका संस्था संचालकांचा सत्कार व्हावा यासाठी प्रा मनोजकुमार नार्वेकर व प्रा गौस मुल्ला यांनी आपल्या पित्यांच्या स्मरणार्थ ट्रस्ट साठी धनादेश संस्थेकडे सुपुर्द् केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.











