गोळवण येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नियोजन बैठक!

मसुरे | झुंजार पेडणेकर ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकव ल येथे शासनाच्या “सेवा पंधरवडा कार्यक्रम” व “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत अभियान यशस्वीपणे राबविणेसाठी नियोजन करणेकामी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मधे राबविले जाणाऱ्या उपक्रमांबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांनी सविस्तर माहिती उपस्थित सर्व ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग यांना दिली. यावेळी अभियान कालावधी मध्ये राबविण्यात येणाऱ्या सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

तसेच सेवा पंधरवडा उपक्रमा अंतर्गत केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्राटर फॉर एग्रीकल्चर “ॲग्री स्टॅग नोंदणी” बाबत उपस्थित शेतकरी वर्गाला माहिती देण्यात आली.

सभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच अभियानाच्या विषयावर लहान गट स्थापित करण्यात आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल ने सहभागी होऊन अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी व कर्मचारी यांनी एकमताने ठराव मंजूर केला.

सदर सभेस ग्रामपंचायत सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा. पं. सदस्य श्री. साबाजी गावडे. सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. शिल्पा तेली, सौ. विभा परब, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. अर्पिता शेलटकर, तलाठी श्रीम. गौरी कोकरे, कृषि पर्यवेक्षक श्री. दशरथ सावंत, कृषि सहाय्यक श्री. नितेश पाताडे, केंद्र प्रमुख श्री. गावित सर, मुख्याध्यापक श्री. संतोष पाताडे सर, श्री. चेंडगे सर तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, गाव गोळवण, कुमामे व डिकवल पोलिस पाटील, ग्रामरोजगार सहाय्यक, आदर्श गाव ग्रामकार्यकर्ता, ग्रामपंचायत कर्मचारी व गाव गोळवण, कुमामे व डिकवल मधील सुमारे १५० ग्रामस्थ उपस्थित होते.