परबवाडा ग्रामपंचायत ‘स्मार्ट ग्राम पुरस्कारा’ ने सन्मानित…

तालुकास्तरीय कार्यशाळेत गटविकास अधिकारी यांच्या हस्ते झाले वितरण

वेंगुर्ले : प्रतिनिधी

पंचायत समिती वेंगुर्ला मार्फत घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये परबवाडा ग्रामपंचायतला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक हॉल येथे झालेल्या तालुकास्तरीय कार्यशाळेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते परबवाडा ग्रामपंचायतला देऊन गौरविण्यात आले.

रोख रक्कम ५ लाख रुपये बक्षीस व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम वेळी परबवाडा सरपंच सौ. शमिका बांदेकर, उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, ग्राम विकास अधिकारी प्रवीण नेमण, ग्राम. सदस्य संतोष सावंत, हेमंत गावडे, कार्तिकी पवार, स्वरा देसाई, अरुणा गवंडे, सुहिता हळदणकर, ग्राम रोजगार सेविका प्राची पवार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. हा पुरस्कार सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे प्राप्त झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.