ध्रुवी हिर्लेकरचा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक !

मसुरे | झुंजार पेडणेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित देवगड तालुका स्तरीय निबंध स्पर्धेमध्ये इयता 5 वी ते 7 वी या गटातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हिंदळे भंडारवाडा या शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. ध्रुवी मंगेश हिर्लेकर हिने देवगड तालुक्यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिने ” ऑपरेशन सिंदुर ” या विषयवार निबंध लेखन केले होते. या स्पर्धेसाठी तिला तिचे शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.