चिपळूण (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविदयालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रास भेट दिली. तिथे उपस्थित केंद्रप्रमुख डॉ.के.वी.मालशे व कनिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी कृषी कन्यांचे स्वागत करून सहकार्य दर्शविले. नंतर कीटक शास्त्रज्ञ डॉ. वानखेडे सरांनी आम्हाला संशोधन केंद्र संबंधी माहिती दिली.
त्यांनी आम्हाला एकूण क्षेत्र, केंद्रांमध्ये लागवड केलेला नारळांच्या जातींबद्दल तसेच नारळामध्ये कीटक व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी नारळा व्यतिरिक्त लागवड केलेल्या मसाले, केळी, लिंबू ,कोकम यांच्या जातींची वैशिष्ट्ये सांगितली. त्यांनी संशोधन केलेल्या नवीन जातींची नावे सांगितली जसे की नारळाची प्रताप konkan bhatye Hybrid १, कोकमची कोकम अमृता व कोकम हातीस, तमालपत्राची कोकण तेज इत्यादी विषयी माहिती सांगितली. त्यांच्या कीटक कार्यशाळेमध्ये बनवल्या जाणाऱ्या कीटकमित्रांविषयी व त्यांचे उत्पादन कसे करतात याविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमिषा कोळी, वृषाली गोफणे, प्रज्ञा गोठणकर, साक्षी गुरव, साक्षी अवतार, सृष्टी काळे, दिक्षा खांडेकर,मृणाल उपाध्ये, प्रीती पेरवी, मयुरी ढेकळे या कृषीकन्यांचे सहकार्य लाभले.









