मैदानी स्पर्धेत देवघर हायस्कूलचे यश

गुहागर/प्रतिनिधी – गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत देवघर आदर्श विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवले.

 

14 वयोगट – गणराज डिंगणकर 600 मी. प्रथम, जिग्नेश शितप -200 मी. प्रथम, 17 वयोगटात दर्शन खांबे -3000 मी. प्रथम, आर्यन मेस्त्री -1500 मी. प्रथम, तन्वेष पालशेतकर -1500 मी. व्दितीय, तन्मय कांबळे -200 मी. व्दितीय, रिया मोरे -400 मी. व्दितीय, सृष्टी आग्रे -800 मी. प्रथम, दिव्यांका सकपाळ – गोळाफेक तृतीय, 100 मी. रिले स्पर्धेत -17 वर्षाखालील मुलींमध्ये अनुष्का कारकर, रिया मोरे, शर्वरी सोलकर, सृष्टी आग्रे, वैष्णवी पारदळे व्दितीय, 17वर्षाखालील मुलांमध्ये तन्मय कांबळे, तन्वेष पालशेतकर, दर्शन खांबे, हर्ष कदम यांनी व्दितीय क्रमांक मिळवला. वरील सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून मार्गदर्शक सावंत सर, व्यवस्थापक गोलेकर सर, मुख्याध्यापक राऊत सर, शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाई सकपाळ यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.