घोटगे येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान; वनविभागाने केला पंचनामा

अखेर मागणी मान्य!!!

शासनाच्या परिपत्रका नुसार समिती गठित करून मागणी नुसार केला पंचनामा…
​
दोडामार्ग : सुहास देसाई

तालुक्यातील शेतकरी यांच्या बागायतीचे नुकसान करत आहें पण पंचनामे वेळेत करत नव्हते ते समिती स्थापन करून करण्यात यावे अशी मागणी केली होती त्याप्रमाणे दि.४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घोटगे येथील शेतकरी संतोषकुमार दळवी यांच्या शेतीत हत्तीने केलेल्या नुकसानीचा पंचनामा वनविभागाच्या संयुक्त समितीने २४ सप्टेंबर २०२५ रोजी केला. पानशिचा डोंगर येथील सर्व्हे नंबर ३०/१ मध्ये असलेल्या दळवी यांच्या शेतीचे आणि शेतातील सौर ऊर्जेवर आधारित कुंपणाचे हत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते.सदर नुकसानीची ​पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामा करण्याची मागणी शेतकरी संतोषकुमार दळवी यांनी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार, वनविभागाने एक संयुक्त समिती स्थापन केली. या समितीमध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील, कृषी पर्यवेक्षक श्री. कोळी, तलाठी श्रीमती मयेकर, वनरक्षक मयूर कोरगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. घंटे, आणि गावातील पंच यांचा समावेश होता.

​आज या समितीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. वनविभागाच्या परिपत्रकानुसार हा पंचनामा करण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्याला योग्य ती नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार आहे. या पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही या वेळी उपस्थित लोकांनी केली आहें यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते