महावितरण मधील यंत्रचालक पदावर काम करणारे महेंद्र कदम झाले सेवानिवृत्त

 

चिपळूण ( वार्ताहर) : म.रा.वीज मंडळ या कंपनीमध्ये यंत्रचालकपदावर कार्यकरत असणारे महेंद्र कदम पदिर्घसेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यापसंगी त्यांचा कार्यकरी आ†भयंती कैलास लवेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

कदम हे 10वी इयत्तेला पास झाल्यानंतर परिस्थिती अभावी त्यांनी खेर्डी येथे दोन वर्षे आयटीआय पूर्ण केला. 1989 साली मीटर टेस्टीक म्हणून ते नोकरीस लागले. ठाणे, धुळे याठिकाणी काम केल्यानंतर 2003 साली त्यांची चिपळूण विभागात मिटर चाचणी शाखेत बदली झाली. त्यानंतर 2010 साली यंत्रचालक पदाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 2011 रोजी त्यांची मंडणगड येथे यंत्रचालक पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मार्गताम्हाणे येथील उपकेंद्र येथे बदली करण्यात आली. नोकरीत करत असताना कदम यांनी म.रा. मागासवर्गीय कर्मचारी पतसंस्थेत 4 वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय 2004 सालापासून भारतीय बौध्द महासभा या संस्थेच्या सचिव पदी 5 वर्षे तर सरचिटणीस पदी 12 वर्षे काम केले आहे. गेल्या तीन वर्षापासून संस्थेच्या जिल्हा पचार आणि पर्यटक विभागात सचिव म्हणून कार्यरत असून सध्या शहर शाखेत अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

त्याच्या सेवानिवृत्ती सत्कार पसंगी कार्यकरी अभियंता कैलास लवेकर, संरेद पालसेतकर, अशोक काजरोळकर, रमेश इंगळे, समीर कदम, नितीन सावंतदेसाई, अमोल मस्के, संदेश गुरव, विरेंद संकपाळ, जयरत्न कदम, किरण कदम, पकाश पवार, अशोक सावंत, सुनील कदम, जीवन पवार, देवराम कदम, तुळशीराम कदम,शिवराम कदम, प्रकाश कदम, संकेत खांडेकर, अशोक सावंत, अमृता पवार, तेजस कदम आदी उपस्थित होते