देवगडच्या प्रांजली वाडेकरचे आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेत यश

मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा २०२५

स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडची प्रांजली वाडेकरने जिंकले रौप्यपदक

प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले

मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा २०२५ मध्ये देवगड तालुक्यातील वाडातर येथील विद्यार्थिनीने चमक दाखवली आहे. भवन्स कॉलेज, अंधेरी, मुंबई यांच्या आयोजनाखाली डॉ. सिंधुताई सपकाळ धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र, ठाणे येथे झालेल्या कंपाउंड प्रकाराच्या स्पर्धेत स. ह. केळकर महाविद्यालय, देवगडची विद्यार्थीनी कु. प्रांजली संजय वाडेकर हिने रौप्यपदक पटकावले.

 

प्रांजलीच्या या यशात साताऱ्यातील ‘दृष्टी धनुर्विद्या अकादमी’चे प्रशिक्षक श्री. प्रवीण सावंत यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या कामगिरीमुळे देवगड तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.