मालवणातील गणेश मांजरेकर या तरुणाचे निधन

मालवण | प्रतिनिधी : मालवण गवंडीवाडा येथील गणेश रमेश मांजरेकर (वय ३५) या तरुणाचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे गोवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

गणेश मांजरेकर हा टेम्पो वाहतूक व्यवसाय करायचा. काही दिवस तो आजाराने त्रस्त होता. त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.