राजापूर हायस्कूल राजापूर च्या विद्यार्थ्यांचे हिंदी कथाकथन व निबंध स्पर्धेमध्ये सुयश

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका हिंदी शिक्षक मंडळामार्फत हिंदी पखवाडा निमित्ताने घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धा व निबंध स्पर्धेत येथील राजापूर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.

या स्पर्धा उमाताई परुळेकर विद्यालय वडवली येथे घेण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थी स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये राजापूर हायस्कूलचे दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील कथाकथन स्पर्धेमध्ये हर्ष दशरथ पुजारे इयत्ता पाचवी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर इयत्ता आठवी ते दहावी या गटामधून निबंध स्पर्धेमध्ये कुमारी वैष्णवी साळवी इयत्ता दहावी क हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे .

या दोन्ही विद्यार्थ्यांना राजापूर तालुका हिंदी शिक्षक मंडळाचे वतीने चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे राजापूर हायस्कूल राजापूर चे मुख्याध्यापक जगदिश भालशंकर, उपमुख्याध्यापक श्री. पवार, पर्यवेक्षिका श्रीमती दर्शना मांडवकर व सर्व हिंदी शिक्षक तसेच संस्था पदाधिकारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

फोटो 27 आरजेपी 1