वेंगुर्ले l प्रतिनिधी :तालुक्यातील कोचरा- अशोकनगर येथील सखाराम विष्णू कोचरेकर वय ५३ हे बेपत्ता झाले आहेत. त्यांची सर्वत्र शोधाशोध करूनही ते सापडले नसल्याने वेंगुर्ले पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.
कोचरा-अशोकनगर येथील सखाराम विष्णू कोचरेकर (53) हे आपले दिर असून ते दि. २४ सप्टेंबर रोजी ८ वाजण्याच्या सुमारास आपली बहीण कांचन हिच्याकडे मुळदे (तालुका कुडाळ) येथे जातो असे सांगून निघून गेले होते. ते चुकून वेंगुर्ला येथे गेल्याने दि. २७ सप्टेंबर रोजी ८ वाजण्याच्या सुमारास त्यास कोचरा येथे घरी जाण्यासाठी वेंगुर्ला बस स्थानकावर त्यांना एस.टी बस मध्ये बसविलेले होते. परंतु अद्याप पर्यंत ते घरी आलेले नाहीत. श्रीमती प्रतिभा देव कोचरेकर (७५) यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशन मध्ये अशी खबर दिली आहे. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सखाराम विष्णू कोचरेकर हे नापत्ता झाल्याची नोंद झाली आहे.
नापत्ता झालेले सखाराम विष्णू कोचरेकर यांचे वर्णन रंग सावळा, बांधा- सडपातळ, उंची सुमारे ५ फूट ५ इंच, उभट चेहरा, केस काळे-पांढरे, दाढी वाढलेली, डोळे काळे, अंगात गुलाबी रंगाचे फुल शर्ट व निळ्या रंगाची जीन्स फुल पॅन्ट, पायात प्लास्टिक स्लीपर चप्पल, हातात स्टीलचे कडे असे आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास वेंगुर्ला पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन वेंगुर्ले पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.











