लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग: दिव्यांग व्यक्तींना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सवलती आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग दाखला (प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दिव्यांग रुग्णांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे राबविण्यात येत आहे.
ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी तपासणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
ही तपासणी खालीलप्रमाणे होणार आहे.
दर बुधवारी: अस्थिव्यंग (Orthopaedic Disability) असणाऱ्या रुग्णांची तपासणी.
दर गुरुवारी: मानसिक व्यंग (Mental Disability) असणाऱ्या रुग्णांची तपासणी.
इच्छुक आणि अर्ज केलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींनी तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहावे.
ई-केवायसी आणि आयुष्मान भारत कार्डासाठी महत्त्वाचे आवाहन
यासोबतच, ज्या दिव्यांग व्यक्तींना आपला दिव्यांग दाखला ई-केवायसी (e-KYC) करावयाचा आहे, त्यांनी तातडीने कार्यवाही करावी.
ई-केवायसीसाठी संपर्क: लाभार्थी आपल्या तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र किंवा जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे येऊन दिव्यांग दाखल्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात.
याव्यतिरिक्त, सर्व दिव्यांग व्यक्तींनी आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. हे कार्ड काढण्यासाठी खालीलप्रमाणे संपर्क साधता येतो:
संपर्क केंद्रे: आशा सेविका, जवळचे आरोग्य केंद्र, जन आरोग्य योजनेतील रुग्णालय.
स्वयं-नोंदणी: लाभार्थी स्वतः आयुष्मान भारत ॲप वापरून कार्ड काढू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क: आयुष्मान भारत योजनेच्या माहितीसाठी डॉ. प्रविण गोरूुले, जिल्हा कार्यक्रम समन्व्यक (आयुष्यमान भारत) यांच्याशी ८९७६७५७१०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
शासकीय सवलती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रक्रियेचा आणि आयुष्मान भारत कार्डाचा लाभ सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.










