एकूण 17 वार्डसाठी आरक्षण,बहुतांश वार्डमध्ये पुरुषांवर अन्याय, पुरुषवर्गात नाराजी
गुहागर | प्रतिनिधी
गुहागर नगरपंचायतचे वार्ड आरक्षण मंगळवारी दापोलीचे प्रांताधिकारी जयराज सूर्यवंशी व गुहागर नगरपंचायतचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या उपस्थितीत भंडारी भवन येथे पार पडले. यामध्ये जवळपास सात वार्डमध्ये सलगपणे महिला आरक्षण पडल्याने अनेक पुरुषांचा हिरमोड झाला आहे.
सोमवारी नगराध्यक्ष पदाचे खुला महिला प्रवर्ग हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या नजरा वार्ड आरक्षणाकडे लागल्या होत्या.वार्ड आरक्षणामध्ये पुरुषांना अधिक संधी मिळेल व पूर्वी ज्या वार्ड मध्ये महिला आरक्षण होते त्या ठिकाणी पुरुषांना संधी मिळेल असे वाटले होते.मात्र पूर्णपणे नव्याने ही सोडत काढली गेल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना सुरुंग लागला.या आरक्षणानंतर बहुतांश वार्डमध्ये पुरुषांवर अन्याय झाला असल्याची चर्चा आहे.
सुमारे 7 हजार इतकी लोकसंख्या असलेल्या गुहागर नगरपंचायतीच्या एका वार्ड मध्ये जवळपास 350 ते 400 इतके मतदान आहे.यावेळी वार्ड क्र.1 मध्ये ना.म.प्र.(पुरुष),वार्ड क्र.2 मध्ये सर्वसाधारण (पुरुष),वार्ड क्र.3 सर्वसाधारण महिला,वार्ड क्र.4 ना.म.प्र.(महिला),वार्ड क्र.5 सर्वसाधारण (महिला),वार्ड क्र. 6 सर्वसाधारण (महिला),वार्ड क्र.7 सर्वसाधारण (महिला),वार्ड क्र.8 सर्वसाधारण (महिला),वार्ड क्र.9 ना.म.प्र.(महिला),वार्ड क्र.10 ना.म.प्र.(पुरुष),वार्ड क्र.11 सर्वसाधारण (पुरुष),वार्ड क्र.12 सर्वसाधारण महिला, वार्ड क्र.13 सर्वसाधारण (पुरुष),वार्ड क्र.14 सर्वसाधारण (पुरुष),वार्ड क्र.15 सर्वसाधारण (पुरुष),वार्ड क्र.16 सर्वसाधारण (पुरुष) तर वार्ड क्र.17 साठी ना.म.प्र.महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे.दरम्यान या आरक्षणाने अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंग झाले आहे.












