३२ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर.
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्यावश्यक ठरणारी आयुष्यमान भारत या योजनेतील कार्ड देण्याची मोहीम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने हॅपी घेतली आहे. कुटुंबाला पाच लाख रुपये पर्यंतचा उपचार मोफत होणार असून या योजनेला मोहीम राबवून गती देण्यात आली आहे. काल एका दिवसात ४५०० कुटुंबांना ही कार्ड देण्यात आली. यापूर्वी एकही गाव शंभर टक्के पूर्णत्वाकडे गेले नव्हते. आता जिल्ह्यातील 32 गावे या योजनेत 100% पूर्ण झाली आहेत. जिल्ह्याचे पालक व राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह यांनी गती दिली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग येथे पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्यात त्यांनी आरोग्यविषयक विविध सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड उपक्रमाला गती मिळाली आहे. जिल्ह्यात काल एका दिवसात तब्बल ४५०० आयुष्मान कार्ड काढ्यात आले आहे. तर आतापर्यंत ४ लाख ६५ हजार १९३ कार्ड काढण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, आयुष्मान भारत योजनेचे समन्वयक डॉ. प्रवीण गोरुले, आदी उपस्थित होते. यावेळी श्री. खेबुडकर म्हणाले की, पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्यात त्यांनी आरोग्यविषयक विविध सूचना केल्या होत्या. त्यांनी आयुष्मान भारत कार्ड आणि वयवंदना योजना कार्ड काढण्याकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. त्यानुसार शनिवारी प्रत्येक तालुक्यातील दहा गावे निवडून त्याठिकाणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी होत कार्ड काढली.
तसेच रविवारी एका दिवसात तब्बल ४,५०० आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ८,१४,४७९ पात्र नागरिकांपैकी आतापर्यंत ४,६५,१९३ नागरिकांची आयुष्मान भारत कार्डे तयार झाली आहेत. यातील ३२ गावे आयुष्मान भारत व वयवंदना योजना कार्ड निर्मितीमध्ये १०० टक्के पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यात सध्या २९ रुग्णालयांचा समावेश आयुष्मान भारत योजनेत असून, लवकरच आणखी रुग्णालयांचा समावेश होणार असल्याची माहिती देण्यात आली.
वयवंदना योजना कार्ड काढा
७० वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू असलेल्या वयवंदना योजना अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान भारतातील ५ लाखांबरोबरच वयवंदना अंतर्गत आणखी ५ लाखांचे मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. म्हणजेच एकूण १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार असल्याने नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीईओ रविंद्र खेबुडकर यांनी केले.












