मंडणगड : प्रतिनिधी, येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव या विद्यालयामध्ये आज बुधवार दिनांक १५/१०/२०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती,” वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ,विजय खाडे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.
यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री. किशोर कासारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर विद्यार्थ्यांकडून विविध ग्रंथांचे वाचन करून घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन देखील केले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय होते. त्यांना शिक्षणाची आवड होती. त्याचबरोबर त्यांनी वाचनाला खूप महत्त्व दिले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. विद्यार्थ्यांनी त्यांचा हा गुण आत्मसात करावा. असे मार्गदर्शन करताना, मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी सांगितले.
शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षिका सौ. मानसी पालांडे ,श्री .मनोज चव्हाण ,श्री .विक्रम शेले, सौ. विनया नाटेकर, सौ. अनिता बिराजदार ,श्री.जितेंद्र कलमकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाई गुडेकर व संजय गौड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाप्रकारे विविध पुस्तकांचे वाचन घेऊन मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.












