कांदळगाव वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शन!

मसुरे | झुंजार पेडणेकर : भारताचे माजी राष्ट्रपती तथा विख्यात वैज्ञानिक दिवंगत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रंथालयामध्ये विविध विषयावरील तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील व त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला गावातील वाचक ग्रामस्थ व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १ च्यावतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रंथदिंडी रामेश्वर मंदिर ते ग्रामपंचायत कांदळगाव येथून ग्रंथालयापर्यंत नेण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये कांदळगावचे सरपंच श्री. रणजीत परब, उपसरपंच श्री. राजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष पारकर, श्री. विहार कोदे, सौ. शारदा मुळये, सौ. अनघा कदम, श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. उदय परब, उपाध्यक्ष श्री. मधुसूदन परुळेकर, खजिनदार श्री.गजानन सुर्वे, सदस्य श्री. विजय नातू , सौ. स्वाती बेलवलकर, सौ. विभावरी मेस्त्री, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव, पोलीस पाटील सौ. शितल परब, जि.प.कांदळगाव नंबर १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मेतर, उपशिक्षिका सौ. ज्योती कर्णे, ग्रंथपाल सौ.साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री. महेश साळकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. आशिष आचरेकर, अंगणवाडीच्या सौ. अक्षता आचरेकर, शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.