दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर लक्ष्मीपूजनावर पावसाचे सावट

दोडामार्ग : तालुक्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग मुसळधार पावसामुळे बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि गावोगावी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लक्ष्मीपूजनाच्या तयारीवर या पावसाने अक्षरशः पाणी फेरले असून व्यापारी व ग्राहकांना गैरसोयी ला सामोरे जावे लागत आहे

सायंकाळी वीज चमकांसह गडगडाटी पावसाने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ठीक ठिकाणी दुचाकी वाहने रस्ता नजीक थांबून पाऊस जाण्याची वाट पाहत होते.एकदरीत पाऊस पडत असल्याने मोठी गैरसोय झाली होती