चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य टेनीकॉइट असोसिएशन मान्यतेने आणि रत्नागिरी जिल्हा टेनीकॉइट असोसिएशन व आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी, काविळतळी, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४२ वी मुले-मुली राज्यस्तरीय ज्युनिअर टेनीकॉइट अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२५ चा समारोप मोठ्या औत्सुक्यात झाला. ही स्पर्धा एस.व्ही.जे.सी.टी क्रीडा संकुल, डेरवण येथे २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झाली असून या स्पर्धेत राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांमधील ६२ संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहर प्रमुख तसेच रत्नागिरी जिल्हा टेनीकॉइट असोसिएशन व आदर्श प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन (भैय्या) कदम, माजी पंचायत समिती सभापती व महिला उपजिल्हा संघटिका सौ. धनश्रीताई शिंदे, महिला शहर संघटिका सौ. वैशाली शिंदे, महाराष्ट्र टेनिक्वाईट संघटनेचे महासचिव अनिल वरपे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्ठे, युवतीसेना तालुका प्रमुख शिवानी कासार, युवतीसेना उपतालुका प्रमुख रेश्मा चव्हाण, शहर विभाग प्रमुख नंदिनी जड्याळ, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली चव्हाण, टेनीकॉइट असोसिएशनचे सचिव मनिष काणेकर, तांत्रिक समिती प्रमुख अशोक ठोकळ, सह खजिनदार, महाराष्ट्र टेनिक्वाईट संघटना श्री. चंद्रकांत पिंपळे, तांत्रिक समिती कन्व्हेनर श्री. कृष्णा ठाकरे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या स्पर्धेत अजिंक्यपद निकाल पुढीलप्रमाणे. मुलांचा गट : सांगली – प्रथम, नंदुरबार – द्वितीय, भंडारा – तृतीय, अहिल्यानगर – चतुर्थ मुलींचा गट : सांगली – प्रथम, नागपूर ग्रामीण – द्वितीय, पुणे शहर – तृतीय, नागपूर शहर – चतुर्थ विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसांनी गौरविण्यात आले. तसेच जम्मू येथे २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १० मुले व १० मुलींची राज्य संघात निवड करण्यात आली.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी श्री. विजय शिंदे, शहरप्रमुख व अध्यक्ष सचिन (भैय्या) कदम, महासचिव अनिल वरपे, क्रीडा संचालक, एस.व्ही.जे.सी.टी. संकुल श्रीकांत पराडकर, उपशहर प्रमुख संतोष पवार, शहर सचिव प्रशांत मुळे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्ठे, विभाग प्रमुख गणेश फके, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, शाखाप्रमुख अल्पेश खेतले, युवासेना सचिव प्रतीक शिंदे, तांत्रिक समिती प्रमुख अशोक ठोकळ, सह खजिनदार चंद्रकांत पिंपळे, तांत्रिक समिती कन्व्हेनर कृष्णा ठाकरे या मान्यवरांच्या हस्ते झाले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय शिंदे, अनिल वरपे, श्रीकांत पराडकर, अशोक ठोकळ, चंद्रकांत पिंपळे, कृष्णा ठाकरे, आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनीचे सचिन (भैय्या) कदम, मनिष काणेकर सदस्य प्रकाश कदम, समीर माळी, महेंद्र काणेकर, सुधीर जाधव, सेजल कदम, सोहम कदम, जियाद चिकटे, रोहन पवार, क्रिश कलकुटकी, रेहान पवार, यश कोलगे, वात्सल्य तिवारी व आदर्श कदम या मान्यवर व युवा स्वयंसेवकांचे विशेष योगदान व सहकार्य लाभले. या स्पर्धेतून राज्यातील टेनीकॉइट खेळाची वाढती लोकप्रियता आणि प्रतिभावान खेळाडूंचा उत्साह अधोरेखित झाला. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र चमू दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली व महाराष्ट्राच्या चमूला आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.











