सामाजिक कार्यकर्ते अकिल नाईक यांना कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर

लांजा( प्रतिनिधी ): येथील सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे कार्याध्यक्ष अकिल नाईक यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेतर्फे कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे
मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अकिल नाईक हे गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय सहभागी आहेत .कोरोना काळात सलग दोन वर्षे त्यांनी गोरगरीब लोकांना अन्नधान्य किटच्य माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत केली होती. याखेरीज चिपळूण, महाड येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना मदत केली होती. याखेरीज शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो .
त्यांच्या एकूणच सामाजिक कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेतर्फे त्यांना कोकण रत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर यांची उपस्थितीत लाभणार आहे.
या पुरस्काराबद्दल अकिल नाईक यांच्यावर तालुक्यातूनच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे