गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते मंडणगड शहरातील साईनगर मधील उद्यानांचे लोकार्पण –

शहरातील पहिले उद्यान महाराष्ट्र भूषण तीर्थरूप श्री. नानासाहेब धर्माधिकारी नाना –नानी पार्क, साई नगर.

मंडणगड : प्रतिनिधी दि. 03- गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्याहस्ते 3 नोव्हेंबर 2025 रोजी मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 5 साई नगर येथे नगरसेवक योगेश जाधव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र भुषण तिर्थरुप श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभ्या करण्यात आलेल्या नाना नानी पार्कचे मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण कऱण्यात आले.
या कार्यक्रमास माजी सभापती अमिता शिंदे, माजी जि.प. अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगरसेवक योगेश जाधव, नगरसेवक, विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, नगरेसविका वैशाली रेगे, सेजल गोवळे, नम्रता पिंपळे, तहसिलदार अक्षय ढाकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, सार्वजनीक बांधकाम उपअभियंता प्रमोद कदम, पोलीस निरिक्षक नितीन गवारे, साईनगर येथील कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस संतोष मांढरे, अर्जुन भोसले, अनिल कलमकर, निलेश गोवळे, इरफान बुरोंडकर, युवा सेना राज्य कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, संजय शेडगे, हरेष मर्चंडे, जयराम राठोड, शंकर म्हाप्रळकर यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील पहिले उद्यान – नगरसेवक योगेश जाधव यांच्या संकल्पनेतून साई नगर येथे निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या नाना – नानी पार्क मुळे उत्तम बगीच्याची सुविधा निर्माण झाली आहे. यापूर्वी या नाना नानी पार्कच्या आतील बाजूस ओपन जिम ची सुविधा निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे हे पार्क लहान मुलांसह सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या उद्यानाच्या सुविधेमुळे साई नगर येथील नागरिकांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.