भाजपच्या सावंतवाडी जनसंपर्क कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर व पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर व राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. य
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, प्रमोद जठार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, युवा नेते विशाल परब, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, सौ. वेदिका परब, ॲड. संजू शिरोडकर, केतन आजगांवकर, अमित परब आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.