महामार्गविरोधी स्थानिकांचा मेळावा संपन्न
बांदा l प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात तांबुळी ग्रामस्थ एकवटले आहेत. प्रस्तावित महामार्गामुळे होणारी पर्यावरणाची हानी, पाण्याच्या स्त्रोतांचे नुकसान तसेच अन्य दुष्परिणाम पाहता महामार्ग प्रकल्पात कोणताही पक्ष किंवा संघटनेचा हस्तक्षेप न घेता सर्व शेतकरी व गावकरी यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला.
दशक्रोशीतील फुकेरी, घारपी, असनिये, झोळंबे, डेगवे, बांदा या गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निश्चय केला आहे.शक्तीपीठ महामार्ग निसर्गाचे मोठे नुकसान होईल अशी भीती गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे गावातील सुमारे ६०० शेतकरी कुटुंबांचे शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घारपी, असनिये, डेगवे, झोळंबे, बांदा गावातील ग्रामस्थानी गावाच्या रक्षणासाठी एकत्रितपणे या महामार्गाला विरोध करावा असे आवाहन करण्यात आले. तशी जनजागृती संबंधित गावात करण्याचे ठरविण्यात आले.
‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ मधील गावात पर्यावरणाचा नाश करणारे मायनिंग प्रकल्प सुरू होण्याचा धोका असल्याचा सूर यावेळी उमटला. तांबुळी, असनिये, घारपी, झोळंबे, फुकेरी, डेगवे ही सर्व गावे ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ (Eco-Sensitive Zone) मध्ये येतात. भविष्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे उत्खनन होऊन मायनिंग सुरू होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या मेळाव्यात प्रथमेश सावंत, प्रकाश सावंत, विश्राम सावंत, तेजस सावंत, राजन सावंत, भालचंद्र सावंत, सागर सावंत, श्रीराम सावंत, बाळकृष्ण सावंत, आर्यन सावंत, विराज सावंत, शांताराम सावंत, आत्माराम सावंत, नारायण सावंत, मंगेश सावंत, शामसुंदर सावंत, कृष्णा सावंत, जगन्नाथ सावंत, दत्तराज सावंत, अशोक सावंत, रुपेश सावंत, उत्तम सावंत, हेमंत सावंत, भास्कर सावंत, अनंत सावंत, मनीष सावंत, प्रवेश सावंत, दत्ताराम सावंत, संदेश सावंत, श्रीसंत सावंत, आशिष सावंत, संतोष सावंत, उमेश सावंत, दत्तप्रसाद सावंत, प्रमोद सावंत, मिलींद सावंत, महादेव सावंत, आनंद सावंत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











