शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात १२ नोव्हेंबर रोजी संगीत सभेचे आयोजन…

वेंगुर्ले l प्रतिनिधी. :शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयात द्वैमासिक संगीत सभा सुरू होत आहेत. बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रंथालयात होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन आयोजकां कडून करण्यात आले आहे.

होतकरू व नवोदित कलाकारांना मंचप्रदर्शनाचा अनुभव यावा, मैफिल रंगविण्याचे तंत्र व उत्तम सादरीकरणाचे कौशल्य विकसित व्हावं, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय,सुगम आदी सर्व संगीत प्रकार, तसेच संवादिनी, तबला, पखावज, बासरी, गिटार, की बोर्ड आदी सर्व वाद्य वादनही या सभेत असेल. या सभेचे पहिले पुष्प आजगाव येथील गायिका ममता दत्तप्रसाद प्रभू आजगावकर हिच्या गायनाने गुंफले जाईल. अधिक माहितीसाठी डाॅ.श्रीराम दीक्षित व विनय सौदागर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.