वर्ल्ड फॉर नेचर इंडिया व निसर्ग मित्र संस्थेचा उपक्रम
दापोली :
वन्यजीव बचाव कार्य निसर्ग संवर्धन बचाव यासाठी काम करणाऱ्या दुर्मिळ वनस्पती दुर्मिळ प्राण्यांचे संवर्धन जतन करणाऱ्या जैवविविधता व निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था व योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान वन विभागाच्या चिपळूण कार्यालयाकडून करण्यात आला. वर्ल्ड फॉर नेचर इंडिया या संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला होता. वर्ड फॉर नेचर इंडिया व भाऊ काटदरे यांच्या निसर्ग मित्र या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या पहिला राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमात वाईल्ड ऍनिमल रेस्क्यूअर & रिसर्च दापोली या संघटनेच्या कामाची दखल घेऊन ‘राजस्तरीय आदर्श संघटना पुरस्कार 2025’ वन अधिकारी गिरीजा देसाई व वर्ल्ड फॉर नेचर इंडिया या संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे, भाऊ काटदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात, कोकणात व पश्चिम घाट परिसरात निसर्ग संवर्धनासाठी मोठे अमूल्य योगदान देणाऱ्या व अकाली मृत्यू झालेल्या चिपळूण येथील निलेश बापट यांच्या कामाचे दखल घेऊन त्यांच्या स्मरणार्थ हा सन्मान निलेश बापट यांची पत्नी जान्हवी बापट यांचाही सन्मानपत्र देऊन गिरीजा देसाई यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.












