खेड : उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील भाजप कार्यालयात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपची कार्यपद्धती आणि विकासाभिमुख भूमिका पाहून प्रवेश केला असल्याचे नवागतांनी सांगितले.
श्री राजेश सखाराम कदम (चाकाळे), श्री मंदार बाबासाहेब कुलकर्णी (कातळ आळी), श्री अंकुश इंगळे, श्री सक्षम संतोष पवार (खांबतळे) आणि श्री प्रथमेश सुर्वे (खेड) यांनी भाजपात प्रवेश केला. पुढील काळात संघटना बळकट करण्यासाठी काम करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हा पक्षप्रवेश शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते आबासाहेब जोशी यांच्या हस्ते झाला. यावेळी वैजेश सागवेकर, बेंदरकर, सोहनी, रोहन राठोड, विजय गुप्ता आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.












