कुंभोज रोडवर तिहेरी अपघातात आजोबा,नात ठार

सुट्टीसाठी मामाच्या गावी गेली होती

गावी परतत असताना घातला काळाने घाला.

प्रतिनिधी/रोहन कांबळे कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मामाच्या गावी सुट्टीला गेलेली सानिका संजय संकपाळ (वय २१,रा. कुंभोज,ता. हातकणंगले) व आनंदराव बापुसो जाधव (वय ५५, रा. लाडेगाव, ता.वाळवा, जि.सांगली) या आजोबा व नातीचा कुंभोज रोडवर ट्रॅक्टर, जीप व मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी झाला. याबाबतचा गुन्हा रात्री उशिरा हातकणंगले पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभोज येथील नात सानिका संपकाळला गावी सोडण्यासाठी आनंदराव जाधव दुचाकीवरून हातकणंगले येथून कुंभोजकडे जात होते. रोडच्या एका साइडला उभा असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नात उसाने भरलेल्या ट्राॅलीच्या मागील चाकाखाली सापडुून गंभीर जखमी झाले.जखमींना तत्काळ सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच दोघांचा सायंकाळी मृत्यू झाला. अपघाताचा गुन्हा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंदविण्यात आला आहे.