‘मूल्यवर्धन ३.०’ या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्याचा वैभववाडीत शुभारंभ 

वैभववाडी, खांबाळे व भुईबावडा प्रभागात प्रारंभ

वैभववाडी l प्रतिनिधी :      शालेय शिक्षण विभाग आणि शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यावतीने  ‘मूल्यवर्धन 3.0’ या सुधारित उपक्रमाद्वारे हे प्रशिक्षण महाराष्ट्रात सर्वत्र अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे. वैभववाडी येथे गट संसाधन केंद्र पंचायत समिती वैभववाडी व खांबाळे, भुईबावडा या ठिकाणी प्रशिक्षण पार पडले.

तीन दिवस चालणाऱ्या पहिल्या टप्प्यातील या प्रशिक्षणात शिक्षकांना मूल्यवर्धनाच्या विविध उपक्रमांबद्दल मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, सामाजिक आणि लोकशाही मूल्ये रुजवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून ते विद्यार्थी भविष्यात जबाबदार नागरिक बनतील. या प्रशिक्षणात मध्ये शिक्षकांसाठी विविध सत्रांमध्ये भूमिका अभिनय आणि वर्ग व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण दिले.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यांचा विकास घडवून आणने काळाची गरज असल्याचे तज्ञ मार्गदर्शक प्रा.एस.बी.शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. वैभववाडी गट संसाधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समिती वैभववाडी येथे आयोजित या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बालगुन्हेगारी, भ्रष्टाचार , सोशल मीडियाचा अतिरेक यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करताना शालेय अध्ययन -अध्यापन प्रक्रियेत विविध खेळ, परिपाठ, विविध शालेय उपक्रम यातून विद्यार्थ्यांमध्ये मुल्यांची रूजवणूक कशी करता येईल याबाबत तज्ञ मार्गदर्शक जयकुमार माने ,ओंकार गुरव , शिवराज करले ,जनाब शहाबुद्दीन नाचरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तिन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणातून भविष्यातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम या मुल्यवर्धन प्रशिक्षणातून होणार आहे.

यावेळी गट शिक्षणाधिकारी अशोक वडर, तज्ञ मार्गदर्शक प्रा. एस. बी. शिंदे, जयकुमार माने ,ओंकार गुरव , शिवराज करले ,जनाब शहाबुद्दीन नाचरे,  बी.आर.सी. समन्वयक म्हणून   वैभववाडी -तानाजी कांबळे, खांबाळे समन्वयक प्रशांत कदम, भुईबावडा समन्वयक सरिता जाधव यांच्यासह तालुक्यातुन प्रत्येक प्रभागात ४० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.