बिहार विधानसभा विजयाचा बांदा भाजप मंडळातर्फे आनंदोत्सव साजरा

बांदा : प्रतिनिधी
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद बांदा भाजप मंडळात जल्लोषात साजरा करण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित या विजयी उत्सवात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, बांदा सरपंच सौ. प्रियांका नाईक, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य शीतल राऊळ, मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, मंडळ सरचिटणीस मधु देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कविटकर आणि मंदार कल्याणकर उपस्थित होते.

यावेळी विजयी घोषणा देण्यात आल्या. यावेळी बांदा उपसरपंच आबा धारगळकर, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा सौ. रुपाली शिरसाट, माजी सभापती सौ. मानसी धुरी, ग्रा. पं. सदस्य सौ. तनुजा वराडकर, आत्माराम गावडे, शैलेश केसरकर, सिद्धेश महाजन, सिद्धेश पावसकर, संदीप बांदेकर, राकेश केसरकर, सुनील राऊळ, वाफोली उपसरपंच विनेश गवस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष व्यक्त केला. बिहारमधील यशामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.