मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर देवतां चरणी सर्व उमेदवार नतमस्तक
जनतेच्या आशिर्वादाने नराध्यक्ष उमेदवार सौं. शिल्पा यतीन खोत यासंह सर्व नगरसेवक उमेदवार बहुमताने विजयी होतील
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण | प्रतिनिधी : भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या उत्साहात मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत असून मालवण शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास या मुद्द्यावर भाजपाचे नराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौं. शिल्पा यतीन खोत यासंह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार बहुमताने विजयी होतील. असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर देवताना श्रीफळ ठेऊन करण्यात आला.
*शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून कटीबद्ध राहू : शिल्पा खोत*
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास व जनतेची सेवा करण्यासाठी सर्वच उमेदवारांना मालवण वासिय जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करेल. भाजपच्या माध्यमातून मोठा विकासनिधी मालवण शहर विकासासाठी आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटीबद्ध राहू असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, निवडणूक प्रभारी रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा सचिव विजय केनवडेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, विकी तोरसकर, दिलीप वायंगणकर, किशोर खानोलकर महिला शहर उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, रश्मी लुडबे, राणी पराडकर, प्रतिभा चव्हाण, पूजा वेरलकर, अस्मिता निव्हेकर, यासंह मालवण शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, पंकज सादये, सुवर्णा वालावलकर, रोहन पेंडुरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, दीपाली वायंगणकर, सौरभ ताम्हणकर, संतोष शिरगांवकर, मरीना फर्नांडिस, सन्मेष परब, सेजल परब, अन्वेशा आचरेकर, रमेश हडकर, आदी उपस्थित होते. घरोघर प्रचाराचा शुभारंभ ही नागरिकांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला. यावेळी नागरिकांनीही उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.
*प्रचार सभा होणार*
भाजपा उमेदवार यांना मार्गदर्शन व प्रचार यंत्रणेचा आढावा पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे मालवण भाजपा कार्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे साहेब यांची प्रचार सभा मालवणात व्हावी यासाठी नियोजन सुरु आहे. एकूणच घरोघर भाजपा उमेदवार प्रचार करतं असून सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतं आहे. असे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
(चौकट वापरणे)
*नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा*
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौं. शिल्पा खोत यांचे नाव जाहीर झाल्या नंतर सर्वच स्तरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतं आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या आणि शिवभक्त म्हणून सामाजिक सेवा कार्यात नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या शिल्पा खोत या सर्वसामान्य जनतेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतं आहे. त्यामुळे जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्याने व आशीर्वादाने नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत व सर्व भाजपा उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.













