बांबोळीत उपचारासाठी नेताना कसाल येथील तरुणाचा मृत्यू

बांदा l प्रतिनिधी :कसाल येथील तरुणाला उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात नेत असताना त्याचा बांदा येथे वाटेतच मृत्यू झाला. सोनू गोविंद कावले (४३) असे त्याचे नाव आहे.

 

सोनू कावले याच्यावर गेले काही दिवस जिल्हा रुग्णायलात उपचार सुरु होते. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलवण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी दुपारी ११.३० वाजता अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने बांबोळीत नेत असताना कावले यांची तब्येत बिघडली. अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. गजानन सारंग यांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.